संगमेश्वरातील फुणगुस, कोंडये गाव १५ तास अंधारात,नागरिकांचा संताप
Team Lokshahi

संगमेश्वरातील फुणगुस, कोंडये गाव १५ तास अंधारात,नागरिकांचा संताप

संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी, कोंडये गावे बुधवार २६ ऑक्टोबरपासून आजतागायत अंधारात आहेत.
Published by :
shweta walge

निसार शेख, चिपळूण: संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी, कोंडये गावे बुधवार २६ ऑक्टोबरपासून आजतागायत अंधारात आहेत. गेली १५ तास उलटूनही वीज न आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. भाऊबीजेच्या दिवशीच म्हणजे काल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लाईट गेल्याने नागरिकांना भाऊबीज अंधारातच करावी लागली.

फुणगुस, कोंडये गावात जवळपास ४००० ते ५००० लोक संख्या आहे. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या गावात १५ तास लाईट नसल्याने लोक संताप झाले होते. ऐन सणामध्ये नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ महावितरण मुळे नागरिकांवर आली आहे. बुधवारी सायंकाळी गेलेली लाईट गुरुवार सकाळी ११ वाजेपर्यंत आलेली नाही. जवळपास १५ तास लाईट नसल्याने नागरिकांनी महावितरणच्या नावाने शिमगा गेला.

विजेसंदर्भात येथील नागरिकांनी महावितरणशी संपर्क साधला असता. फुनगुस येथील फिडरवर पोलचा डीस्क फुटला आहे. त्यामुळे लाईट येण्यास २ तास लागतील असे नागरिकांना कळवले होते. मात्र १५ तास झाले तरी अद्याप लाईट न आल्याने नागरिकांनी महावितरणच्या नावाने शिमगा केला.

संगमेश्वरातील फुणगुस, कोंडये गाव १५ तास अंधारात,नागरिकांचा संताप
सप्तशृंगी संस्थानचा भाविकांसाठी महत्वाचा निर्णय, आजपासून देवीचं 24 तास दर्शन
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com