'भावी मुख्यमंत्री जयंत पाटील'; पोस्टरमुळं चर्चेला उधाण
Admin

'भावी मुख्यमंत्री जयंत पाटील'; पोस्टरमुळं चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर काही पोस्टर्स झळकले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर काही पोस्टर्स झळकले आहे. या पोस्टर्सवर जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या पोस्टर्सवर बॉस, माझं दैवत असाही उल्लेख करण्यात आला आहे. तसंच यावर संतोष पवार आणि हितेंद्र सावंत या दोन पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com