Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

'देशा आणि राज्याप्रती 'त्यांचं' हे बेगडी प्रेम आहे'; मुख्यमंत्र्यांचा नेमका कुणाला टोला?

जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीसाठी संरक्षण मंत्री अमित शाह , भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना कुणाला तरी चांगलाच टोला लगावला आहे. शिंदे म्हणाले की, आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या देशासाठी यजमानपद मिळालंय. तसेच हा फक्त केंद्राचा कार्यक्रम नव्हता. तर महाराष्ट्रात 4 समिट बैठका होत आहेत. या बैठकीत सादरीकरण झालंय. तसेच बेळगांव सीमा बांधवांबद्दल बोलत आहेत, त्यांनी धाडसीपणा आम्हाला सांगू नका. हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेल मध्ये राहिलाय. विकासाच्या गप्पा मारणा-यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते आज कार्यक्रमाला आले नाही. अजित दादा तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका. आरोपाला उत्तर देण्यासाठी आम्ही रिकामे नाही, आम्ही कामानं उत्तर देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.

यासोबतच निमंत्रण सर्व पक्षाला गेलं होतं. मात्र राज्याचं तसेच देशाचं देशप्रेम यातून दिसलं. या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचंय? हे बेगडी प्रेम आहे, मी मुख्यमंत्री झालो तर काही लोक घराबाहेर आले. आता आम्ही समृद्धी मार्गावर गेलो तर काही लोक रस्त्यावर आले. असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com