महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची मोठी कामगिरी; गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
Admin

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची मोठी कामगिरी; गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान

गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम परिसरात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम परिसरात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे.

या चकमकीत नक्षलवाद्यांमध्ये पेरीमली दलमचा कमांडर बेटलू मडावीचाही समावेश आहे. यात पोलिसांचे कुठलेही नुकसातन झाली नसून चकमक आता थांबली आहे. पोलिसांच्या तुकड्यांवर नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला होता. त्यावेळी प्रत्युत्तर दाखल नक्षल विरोधी पोलीस पथकाने गोळीबार केल्यानंतर तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com