नितीन गडकरींची मोठी घोषणा; सीट बेल्टबाबत नवी नियमावली जाहीर...
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सीट बेल्टबाबत आणखी एक घोषणा केली आहे. ते म्हणाले की आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल. म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना देखील सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल.
पीटीआयच्या वृत्तानुसार केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138(3) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. मात्र हा नियम अनिवार्य आहे. याबद्दल बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट घातल्याने वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सायरस मिस्त्री अपघातामुळे मी ठरवलय की ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवर देखील सीट बेल्टचा अलार्म असेल. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मंगळवारी सांगितले की कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाती मृत्यू नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना व्यवस्थित रित्या सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.