भाजपाकडून सापत्न वागणूक असं बोललोच नाही - गजानन कीर्तिकर
Admin

भाजपाकडून सापत्न वागणूक असं बोललोच नाही - गजानन कीर्तिकर

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत संसार थाटला व मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर विराजमान झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत संसार थाटला व मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर विराजमान झाले. शिंदे गट व भाजपमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे आतापर्यंत चित्र होते. परंतु, शिंदे गटाच्या एका नेत्याने खंत व्यक्त केली आहे. भाजप आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचे शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी सांगितले होते. यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

मात्र आता त्यांनी घूमजाव केलं आहे.भाजपाकडून सापत्न वागणूक मिळते असं बोललोच नाही तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला. आमची आणि भाजपाची युती झाली आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही खासदार म्हणून भाजपासह गेलो. असे किर्तीकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com