Tuljapur : लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू तुळजापुरात, सहकुटुंब घेतलं तुळजाभवानीचं दर्शन
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत लोकशाही मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा गणेश नायडू यांनी आपल्या कुटुंबीयांसह तुळजापूर येथे दर्शन घेतले. सध्या तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असून, या पावन काळात पौर्णिमेच्या दिवशी नायडू कुटुंबीयांना अभिषेक पूजेचा मान लाभल्याने हा क्षण अधिकच भाविक आणि विशेष ठरला.
तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नायडू कुटुंबीयांसाठी दर्शनाची खास आणि नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. विधीवत पूजा, अभिषेक आणि आरतीच्या माध्यमातून आई तुळजाभवानीच्या चरणी नायडू कुटुंबीयांनी कृतज्ञतेने माथा टेकवला. दर्शनावेळी भक्तिभाव, श्रद्धा आणि समाधान यांचा संगम पाहायला मिळाला.
या प्रसंगी मंदिर संस्थानचे महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा आणि विशाल रोचकरी यांनी गणेश नायडू यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. मानाचा फेटा, कवड्याची माळ आणि श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन नायडू कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला. मंदिर परंपरेनुसार करण्यात आलेल्या या सत्कारामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.
