लसणाची फोडणी महागली;लसणाच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ

लसणाची फोडणी महागली;लसणाच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ

लसणाच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
Published by :
Siddhi Naringrekar

भाजीत फोडणीसाठी वापरणाऱ्या लसणाने चांगलाच भाव खाल्ला असून सध्या घाऊक बाजारात एक किलो लसणाला 350 रुपये मोजावे लागत आहे. तर किरकोळ बाजारात 400 ते 450 चा दर लसणाला मिळत आहे.

त्यामुळे लसणाची फोडणी महागली आहे. लसणाची आवक कमी होत गेली आणि या आठवड्यात लासनाने घाऊक बाजारात 350 तर किरकोळ बाजारात 450 रुपये किलोपर्यंत दर गाठले आहे.

त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचा भाव प्रतिकिलो 400 ते 450 रुपये झाला आहे येणाऱ्या काळात हे भाव असेच चढे राहतील अस व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे लसणाचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर दरामध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com