Gatari Special 2025 : गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार
Gatari Special 2025 : गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहारGatari Special 2025 : गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार

Gatari 2025 Special Non- veg Recipe: गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार

गटारी 2025: घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मासांहार, मटण घी रोस्ट आणि गावरान चिकन.
Published by :
Riddhi Vanne
Published on

श्रावण महिना हा व्रत आणि सणांनी भरलेला असतो. यामध्ये अनेकजण मासांहार करत नाही. त्यामुळे आषाढीचा शेवटचा दिवस हा खवय्यांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. तर, मग यंदाच्या गटारीला करा हे मासांहारी पदार्थ जे घरी बनवल्यानंतर तुम्ही हॉटेलासुद्धा विसरुन जालं.

मटण घी रोस्ट

साहित्य

750 ग्राम मटण

300 ग्राम उभा चिरलेला कांदा

3-4 टेबलस्पून तूप

2 टेबलस्पून आलं, लसूण,मिरची, कोथिंबीर,पेस्ट

2 टेबलस्पून लिंबाचा रस

2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर

1 टेबलस्पून भंडारी लाल तिखट / ठेवणीतला मसाला

1/2 टीस्पून हळद

1 टीस्पून गरम मसाला / मटण मसाला

2 मध्यम आकाराचे बटाटे (आवडत असलयास)

चवीनुसार मीठ

भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर

खडे मसाले

1 इंच दालचिनी

2 तेजपत्ता

3-4 लवंगा

3-4 हिरवी वेलची

2 मोठी वेलची

5-6 काळीमिरी दाणे

कृती

आधी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ची मस्त अशी पेस्ट करून घ्या. सर्वात आधी, मटण स्वच्छ धुवून त्याचे हवे त्या आकाराचे छोटे किंवा मोठे तुकडे करून निथळत ठेवा, त्यांनतर 1 टेबलस्पून आपली तयार पेस्ट, चवीनुसार मीठ, आणि लिंबाचा रस घालुन मटण अर्धा ते पाऊण तास मॅरीनेट करायला ठेवून द्या. आता एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करायला ठेवा. काही खडे मसाले त्यात घालून घ्या,आणि आरोमा येई पर्यंत परतून घ्या. आता यात कांदा घालून सोनेरी रंगावर परतावे. कांदा चांगला फ्राय झाला की नंतर 1 टेबलस्पून तयार मिरची, आलं, लसूण कोथिंबीर पेस्ट घालून परतावे. सर्व जिन्नस चांगले एकजीव झाले की आता यात मॅरीनेट केलेले मटण घालून घ्या, मटण चांगले परतून घ्या.

आता मटणावर झाकण ठेवून 20 -25 मिनटं छान शिजू द्या, मध्ये मध्ये झाकण काढून परतत राहा, म्हणजे तळाला लागणार नाही. आता मटण शिजत आले की त्यात जाडसर कापलेले बटाटे घालून घ्या, वाफेत 5-10 मिनटं परत झाकण ठेवून शिजू द्या, मध्ये मध्ये परतत राहा. (मी बटाटे घातले तेव्हा सोबत,मटण कलेजी सुद्धा घातली,आधी घातली तर ती जास्त शिजते). आता बटाटे शिजत आले की, त्यात हळद काश्मीरी मिरची पावडर,भंडारी लाल तिखट किंवा ठेवणीतला मसाला, गरम मसाला किंवा मटण मसाला घालून मिक्स करून घ्या. मटण व्यवस्थित शिजू द्या, छान मऊ शिजले की वरून खूप सारी कोथिंबीर घालून घ्या,झाकण ठेवा. तेव्हा तयार आहे "घी रोस्ट मटण मसाला" गरमागरम रोटी भाकरी फुलके सोबत गरमागरम मटण.

गावरान चिकन

400 ग्रॅम चिकन

3 मोठे चमचे तेल

थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

1 कांदा, 2 टोमॅटो, 7-8 काळेमिरी, दगड फुल, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आले

कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट

1 चमचा मिक्स लाल तिखट मसाला

चवीनुसार मीठ

प्रथम एका पॅनमध्ये 3 मोठे चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर, त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि 1 कांदा, 2 टोमॅटो, 7-8 काळेमिरी, दगड फुल, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आले घालून वाटून घेतलेला मसाला, आणि कोथिंबीर हिरवी मिरचीचे वाटण घालून ते तेलामध्ये चांगले परतून घेतले. मग त्यात 400 ग्रॅम स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुऊन घेतलेले चिकन घालून ते चांगले परतून घेतले. नंतर त्यात 1मोठा चमचा मिक्स मसाला, 2मोठे चमचे कांदा सुके खोबरे भाजून, वाटून घेतलेला मसाला घालून, चवीनुसार मीठ घालून ते चांगले परतून घेतले. आणि त्यात 2 कप पाणी घालून, झाकण ठेवून चांगले शिजवून घेतले. आता तयार झालेले झणझणीत गावरान चिकन एका भांड्यात काढून घेतले. आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपले झणझणीत गावरान चिकन. हे चिकन तांदळाच्या भाकरी बरोबर, भाता बरोबर खूप सुंदर लागते.

चिकन टिक्का बिरयानी

500 ग्रॅम बोनलेस चिकन, लहान तुकडे केलेले

1 कप दही

2 चमचे आले-लसूण पेस्ट

1 चमचा लाल तिखट

1/2 चमचा हळद

1 चमचा गरम मसाला

1/2 चमचा जिरेपूड

1/4 चमचा जायफळ पूड

1/4 कप लिंबाचा रस

2 चमचे तेल

मीठ चवीनुसार

बिर्याणीसाठी:

1 किलो बासमती तांदूळ, 30 मिनिटे भिजवलेले

3-4 मोठे कांदे, पातळ चिरलेले

2-3 टोमॅटो, बारीक चिरलेले

1/2 कप पुदिना, बारीक चिरलेला

1/2 कप कोथिंबीर, बारीक चिरलेली

4-5 हिरव्या मिरच्या, उभ्या चिरलेल्या

1/4 कप तेल किंवा तूप

1 चमचा जिरे

2-3 तमालपत्र

2-3 दालचिनीचे तुकडे

4-5 लवंगा

4-5 हिरव्या वेलची

1/2 जायफळ

1/2 स्टार फुल

1/4 चमचा केशर (दुधात भिजवलेले)

गरम पाणी

मीठ चवीनुसार

कृती:

एका भांड्यात चिकन, दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरेपूड, जायफळ पूड, लिंबाचा रस, तेल आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. 2-3 तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. चिकनला मॅरीनेट केल्यानंतर, ते ग्रील किंवा तव्यावर थोडे तेल किंवा तूप घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवून घ्या. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा. त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंगा, हिरवी वेलची, जायफळ आणि स्टार फुल टाका. पाणी उकळल्यावर तांदूळ आणि मीठ टाका. 70-80% शिजल्यावर पाणी काढून टाका. एका जाड तळाच्या पातेल्यात थोडे तेल किंवा तूप गरम करा. त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत तळा. टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून थोडे परतून घ्या. पातेल्यात अर्धा शिजलेला भात पसरवा. त्यावर चिकन टिक्का, कांदा-टोमॅटो मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि केशरचे मिश्रण टाका. उरलेला भात पसरवून त्यावर पुन्हा मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि केशरचे मिश्रण टाका. पातेल्यावर झाकण ठेवून, 5-7 मिनिटे मध्यम आचेवर आणि 10-15 मिनिटे मंद आचेवर दम द्या. गरमागरम चिकन टिक्का बिर्याणी दही किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.

मटण चॉप्स

मटण चॉप्स (Mutton Chops) बनवण्यासाठी, प्रथम मटण चॉप्सला मसाले लावून घ्या. मग ते गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुम्ही मसाला आणि रस्सा (gravy) सोबतही सर्व्ह करू शकता.

साहित्य:

1 किलो मटण चॉप्स

1/2 कप दही

1 चमचा आले-लसूण पेस्ट

1 चमचा लाल तिखट

1/2 चमचा हळद

1 चमचा गरम मसाला

1/2 चमचा जिरेपूड

1/4 चमचा धणेपूड

1/4 चमचा काळी मिरी पावडर

2 मोठे चमचे तेल

1 बारीक चिरलेला कांदा

1 टोमॅटो, बारीक चिरलेला

1/2 कप पाणी

चवीनुसार मीठ

कोथिंबीर (सजावटीसाठी)

कृती:

मटण चॉप्सला मीठ, हळद, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड आणि काळी मिरी पावडर लावून घ्या. दही घालून चांगले मिक्स करा आणि 2-3 तास मॅरीनेट करा. एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत तळा. टोमॅटो घालून चांगले मिक्स करा आणि तेल सुटेपर्यंत शिजवा. मॅरीनेट केलेले मटण चॉप्स घालून चांगले मिक्स करा. 1/2 कप पाणी घालून मंद आचेवर 20-25 मिनिटे किंवा मटण शिजत नाही तोपर्यंत शिजवा. गरमागरम मटण चॉप्स कोथिंबीरने सजवून भात किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.

टीप:

तुम्ही चॉप्स तळण्याऐवजी कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या देऊन शिजवू शकता. मसाल्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. तुम्ही यात तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता.

गरमागरम मटण चॉप्ससोबत कांदा आणि लिंबू सर्व्ह करा.

मटण चॉप्स मसाला (पर्यायी):

कांदा, टोमॅटो, आले-लसूण, मसाले आणि थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत शिजवा. शिजवलेले मटण चॉप्स घालून चांगले मिक्स करा. गरम मसाला आणि कोथिंबीर घालून 2 मिनिटे शिजवून घ्या. गरमागरम मटण चॉप्स मसाला भात किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com