Bigg Boss 19  :  बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव!

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. ऑगस्ट महिन्यात बिग बॉसचा एकोणिसावा सिझन सुरू झाला होता. त्याची सांगता आज (7 डिसेंबर 2025) झाली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. ऑगस्ट महिन्यात बिग बॉसचा एकोणिसावा सिझन सुरू झाला होता. त्याची सांगता आज (7 डिसेंबर 2025) झाली. गौरव खन्नाने या सीझनच्या स्पर्धेत आपली पकड मजबूत ठेवली आणि त्याने इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. फरहाना भट्टने गौरवला कमालीची टक्कर दिली. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात अनेक रोमांचक आणि भावनिक क्षण पाहायला मिळाले. सलमान खानच्या “बिग बॉस १९” च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांचा समावेश होता. हे सर्व प्रेक्षकांच्या मनावर ठराविक छाप सोडून गेले आहेत. ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक परफॉर्मन्स झाले.

विजेता ठरलेल्या गौरव खन्नाला 50 लाख रुपये बक्षीस आणि बिग बॉसची ट्रॉफी देण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरात चौदा आठवडे टिकणं ही काही सहजसोपी गोष्ट नाही. त्यासाठी या स्पर्धकांना शोचे कठोर नियम, नियमांना धरून बनवलेला फॉरमॅट या सर्वांचं काटेकोरपणे पालन करावं लागलं आहे. त्याचसोबत आपल्या खेळीने प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येतील, याचंही भान त्यांना ठेवावं लागलं आहे. यंदाच्या सिझनमध्ये गौरव अगदी पहिल्या एपिसोडपासून चर्चेत होता.

बिग बॉस म्हटलं की ड्रामा, भांडणं आणि आरडाओरड हे सर्व आलंच. या शोची ओळखच तशी असल्याने गौरवच्या शांत खेळीची खिल्ली उडवण्यात आली होती. पण जसजसा खेळ पुढे गेला, तसतसा गौरव बिग बॉसच्या घरातील स्ट्राँग स्पर्धक ठरला. फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करणारा तो पहिला स्पर्धक ठरला होता. तिकिट टू फिनाले जिंकल्यानंतर आता गौरवने विजेतेपदही पटकावलं आहे.

प्रणित मोरे आऊट, फरहाना आणि गौरव टॉप २ मध्ये

वोटिंगनुसार प्रणित मोरे तिसऱ्या क्रमांकावर बाहेर आला आणि त्यानंतर १० मिनिट्ससाठी वोटिंग लाईन ओपन करण्यात आली. यातून फऱहाना आणि गौरव या दोघांपैकी विजेता ठरविण्यात येणार असल्याचे सलमानने सांगितले. दरम्यान कुनिका, नेहल आणि फरहानाचा परफॉर्मन्स दाखविण्यात आला.

.

सगळे स्पर्धक उपस्थित

यावेळी एकमेकांमध्ये कितीही दुरावा आणि रागरुसवा असला तरीही ग्रँड फिनालेसाठी सर्व स्पर्धक हजर राहिले होते. यावेळी ग्रँड फिनालेच्या वेळीही बशीर आणि नेहल दोघांमध्ये भांडण झाल्याचे दिसून आले. तर ५ फायनल स्पर्धकांमध्ये शेवटपर्यंत चुरशीची लढत पहायला मिळाली. गौरव आणि फरहानामध्ये चुरशीची लढत झाली आणि अखेर बिग बॉस १९ चा विजेता मिळाला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com