Gauri Garje Case : गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण, अनंत गर्जे याला 2 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
डॉ. गौरी गर्जे यांच्या रहस्यमय आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए असलेले अनंत गर्जे यांची ४ दिवसांची पोलिस कोठडी आज (२७ नोव्हेंबर) संपली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अनंत गर्जे यांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जखमांचे गूढ, सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाईल रेकॉर्डिंगमुळे वाढली शंका गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे ही आत्महत्या की काही वेगळं, याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला. याशिवाय गौरी यांच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग, तसेच घरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
प्रकरणाचा पार्श्वभूमी
डॉ. गौरी गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या केली होती. त्यानंतर या मृत्यूमागे नेमके कोणते कारण होते, वैयक्तिक वाद, कौटुंबिक कलह की इतर काही कारण, याचा तपास सुरू आहे. पती अनंत गर्जे हे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असल्याने प्रकरणाला आणखी गती मिळाली आहे.
