Devendra Fadnavis : गौरी गर्जेचा संशयास्पद मृत्यू, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis : गौरी गर्जेचा संशयास्पद मृत्यू, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजकीय वर्तुळात ही माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजकीय वर्तुळात ही माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. 10 महिन्यांपूर्वी अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे लग्न झाले. मात्र, अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व्हायची. केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे (Gauri Palve Garje) यांनी याच मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समजते. शनिवारी संध्याकाळी आत्महत्या (Suicide news) गौरी पालवे गर्जे यांनी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे गौरी पालवे गर्जे यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. याप्रकरणात अखेर रविवारी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची (Mumbai news) तर गौरी पालवे यांच्या मामांनी गर्जेंवर आरोप करत सखोल चौकशी व्हावी, सीबीआयची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणालेत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी तुमच्याकडे सीबीआयची मागणी केली या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, अजून माझ्याकडे यासंदर्भातील पूर्ण ब्रिफिंग आलेलं नाही. मला प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रिफिंग केल्यावरच याबाबत बोलता येई, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

'या' प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी

गौरी पालवेंचे मामा हृषिकेश गर्जे यांनी म्हटलं आहे की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. एका कुटुंबाने मिळवून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा. गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की, या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि इन कॅमेरा पोस्टमार्टम करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com