बँकेतील कामे आजच उरकून घ्या; उद्या बँकांचा  देशव्यापी संप

बँकेतील कामे आजच उरकून घ्या; उद्या बँकांचा देशव्यापी संप

बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते आजच उरकून घ्या.

बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते आजच उरकून घ्या. कारण उद्या 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या दरम्यान देशभरात बँकिंग सेवा ठप्प होऊ शकतात. या देशव्यापी संपामुळे बँकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एआयबीईएचे सरचिटणीस व्यंकटचलम यांनी सांगितले की, "बायपार्टाइट सेटलमेंट (BPS) च्या तरतुदींमध्ये कोणताही बदल किंवा जोडणी परस्पर केली जाऊ शकते अशी आमची सूचना असूनही, आऊटसोर्सिंग, कर्मचार्‍यांची फिरती बदली, शिस्तभंगाच्या कृती प्रक्रियेचे पालन, ट्रेड युनियन प्रतिनिधित्व, नोकरी सुरक्षा यावर त्यांचे निर्णय मागे घेतील, असे कोणतेही स्पष्ट आश्वासन ते देऊ शकले नाहीत.

तसेच कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक किंवा समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे बँक युनियन्सने 19 नोव्हेंबरचा नियोजित देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने कॅथोलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचार्‍यांना 11 व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग (कॅश मूव्हमेंट जॉब आणि हाऊसकीपिंग जॉब) आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com