घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली; मोठे नुकसान

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली; मोठे नुकसान

घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी फुटली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 30 डिसेंबर रोजी रात्री मुंबईतील असल्फा परिसरात लोक घरात झोपलेले असताना 72 इंचाची पाण्याची पाइपलाइन फुटली.

या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले. मध्यरात्री 2 ते 2.30 पर्यंत पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली, मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे, त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहे. ळालेल्या माहितीनुसार, या पाण्याचा दाब इतका जोरदार आहे, की ते सुमारे 10 फुटांपर्यंत उसळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com