Giorgia Meloni यांच्या वाढदिवसानिमित्त अल्बेनियन पंतप्रधान रामा यांनी दिलं खास गिफ्ट
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या नेहमीच चर्चेत असतात. अल्बेनियन पंतप्रधान एडी रामा यांनी जॉर्जिया मेलोनी यांना महागडा स्कार्फ भेट दिला. मात्र, स्कार्फ भेट देण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी बुधवारी मेलॉनी यांचा 48 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मेलोनीपेक्षा खूप उंच असलेल्या रामा यांनी एका गुडघ्यावर बसून मेलॉनी यांना हे गिफ्ट दिलं आहे. "तंती ऑगुरी" (वाढदिवसाच्या शुभेच्छा) गायले आहे. अबू धाबी येथे होणाऱ्या जागतिक फ्युचर ऊर्जा शिखर परिषदेला हे दोन्ही नेते उपस्थित होते.
अल्बेनियामध्ये स्थलांतरित झालेल्या इटालियन डिझायनरने हा आकर्षक, वजनाने हलका असणारा स्कार्फ डिझाईन केला असल्याचं रामा यांनी मेलोनी यांना माहिती दिली. मेलोनी इटलीच्या उजव्या विचारसरणीचे नेतृत्व करणाऱ्या मेलॉनी आणि अल्बेनियाच्या सोशलिस्ट पार्टीचे प्रमुख असलेले रामा यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
मेलोनी यांनी गेल्या वर्षी केलेल्या करारामुळे इटलीने समुद्रातून उचललेल्या काही स्थलांतरितांना अल्बेनियामधील डिटेंशन सेंटरमध्ये वळवले होते. बुधवारी झालेल्या शिखर परिषदेत, इटली, अल्बानिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यामध्ये किमान 1 अब्ज युरो ($1 अब्ज) किमतीच्या करारावर स्वाक्षरी केली.