ताज्या बातम्या
Girish Mahajan On Eknath Khadse : 'अजित पवार गटाकडून मला ऑफर', खडसेंच्या 'या' वक्तव्यावर गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
भाजप आमदार गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांच्याबाबत विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं.
भाजप आमदार गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांच्याबाबत विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं. खडसेंना कोणीही पक्षात घेत नाही, असं म्हणत महाजन यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून, अजित पवार यांच्याकडून मला ऑफर होती, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं. यावर बोलताना महाजन म्हणाले की, "जाऊ द्या हो, त्या खडसेंना कोणी पक्षात घेत नाही. इकडे-तिकडे पडत फिरत आहे, असं म्हणत एकनाथ खडसेंवर गिरीश महाजन यांनी बोलणं टाळलं."