पुण्यात कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या...

पुण्यात कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या...

पुणे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलं आहे. कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला.

गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आता आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपींच्या शोधासाठी आणि अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि डीबीची दहा पथके नेमण्यात आली आहेत. 12 तासांत पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना घडल्या. यासोबतच काल गुरुवारी सकाळी वानवडी भागात स्कूलबस चालकांकडून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.

या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com