गोवा काँग्रेसमध्ये भूकंप, 8 आमदार भाजपात प्रवेश करणार

गोवा काँग्रेसमध्ये भूकंप, 8 आमदार भाजपात प्रवेश करणार

गोव्यात काँग्रेसचे 8 आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. थोड्याच वेळात आमदारांचा भाजपात प्रवेश होणार आहे.

गोव्यात काँग्रेसचे 8 आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. थोड्याच वेळात आमदारांचा भाजपात प्रवेश होणार आहे. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजप प्रवेश होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच गोव्यात ऑपरेशन लोटस राबवण्यात भाजपाला अपयश आलं होतं. मात्र आता हे यशस्वी ठरताना दिसत आहे.

गोवा विधानसभेत एकूण 40 सदस्यसंख्या आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच येथे विधानसभा निवडणुका झाल्या. यात भाजपा आणि मित्रपक्ष अर्थात NDA चे 25 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 11 आमदार आहेत. मात्र आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजपात प्रवेश होत असल्याची घोषणा केली आहे.

कोण-कोण आमदार?

मायकल लोबो (माजी विरोधी पक्षनेते)

दिगंबर कामत,

दिलायला लोबो,

राजेश फळदेसाई,

रुदाल्फ फर्नांडिस,

अलेक्स सिक्वेरा,

केदार नाईक,

संकल्प आमोणकर

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद तनावडे यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्यार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजपात प्रवेश होणार असल्याने त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही आणि ते भाजपात विलीन होतील, असे म्हटले जात आहे. यापैकी काही आमदारांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

Lokshahi
www.lokshahi.com