Goa Night Club Fire : गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरण; लुथ्रा बंधूना परत आणण्यासाठी प्रयत्न
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Goa Night Club Fire) गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या आगीच्या घटनेनंतर नाइटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा हे थायलंडला पळून गेले. त्याचवेळी या क्लबच्या तिसऱ्या मालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात या प्रकरणाचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आगप्रकरणी नाइटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांच्याविरोधात इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ बजावली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
Summery
उत्तर गोव्यातील आगप्रकरण
लुथ्रा बंधूना परत आणण्यासाठी प्रयत्न
नाइटक्लब आगप्रकरणी इंटरपोलची ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी
