Goa Night Club Fire : गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरण; लुथ्रा बंधू ताब्यात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Goa Night Club Fire) गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या आगीच्या घटनेनंतर नाइटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा हे थायलंडला पळून गेले. त्याचवेळी या क्लबच्या तिसऱ्या मालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात या प्रकरणाचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.
आग प्रकरणी नाइटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांच्याविरोधात इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ बजावली, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर आता थायलंड पोलिसांनी फुकेतमधील लुथरा भावंडांना ताब्यात घेतले आहे. यासोबतच गोवा पोलिसांनी कारवाई करत नाईटक्लब अग्निकांडातील मुख्य आरोपी गौरव आणि सौरभ लुथ्रा यांचे पासपोर्ट रद्द केल्याची माहिती मिळत आहे.
Summery
गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरण
लुथ्रा बंधूना ताब्यात घेतलं
गौरव आणि सौरभ लुथ्रा यांचे पासपोर्ट रद्द
