गोकुळकडून दूध खरेदी दरातही दरवाढ; जाणून घ्या नवा दर
Admin

गोकुळकडून दूध खरेदी दरातही दरवाढ; जाणून घ्या नवा दर

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाकडून दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाकडून दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे. दरवाढ केल्याने दूध उत्पादकांना फायदा होणार आहे. सध्या दैनंदिन दूध संकलन सरासरी 15 लाख लिटर आहे. त्यापैकी म्हैस दूध आठ लाख 50 हजार लिटर आणि गाय दूध सहा लाख 50 हजार लिटर इतके आहे. या दूध दरवाढीमुळे रोज सरासरी 30 लाख रुपये म्हणजेच प्रतिमहिना नऊ कोटी रुपये रक्कम संघाच्या दूध उत्पादकांना दूध बिलापोटी अतिरिक्त मिळणार आहेत. असे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

म्‍हशीच्या दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर 49.50 रुपये राहिल आणि गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर 37 रुपये. अशी दरवाढ करण्यात आली आहे. म्‍हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com