Gokul Milk Price Hike : गोकुळचे दूध उद्यापासून 'इतक्या' रुपयांनी महागणार; जाणून घ्या दर
गोकुळचे दूध उद्यापासून दोन रुपयांनी महागणार आहे. गोकुळने म्हैस आणि गाय दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबई आणि पुण्यात प्रतिलिटर 74 रुपये तर कोल्हापूर सह इतर ठिकाणी लिटरला 68 रुपये मोजावे लागणार आहेत. संघाने जानेवारीमध्ये म्हैस तर महिन्याभरापूर्वी गाय दूध खरेदी दर दोन रुपयांनी वाढवला होता.
गायीच्या दूधाचा दर. सध्याचा दर वाढीव दर
मुंबई पुणे - 56 58
कोल्हापूर सह 48 50
इतर ठिकाणी
म्हैशीच्या दूधाचा दर सध्याचा दर वाढीव दर
मुंबई पुणे 72 74
कोल्हापूर सह 66 68
इतर ठिकाणी