गोकुळच्या दूध दरात वाढ, गायीचं दूध प्रति लिटर एवढ्या रुपयांनी महागलं

गोकुळच्या दूध दरात वाढ, गायीचं दूध प्रति लिटर एवढ्या रुपयांनी महागलं

वाढत्या महागाईची झळ आता जास्तच वाढत चालली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

वाढत्या महागाईची झळ आता जास्तच वाढत चालली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

गोकुळकडून ही दुधाची दरवाढ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. गोकुळने गायीच्या दुधामध्ये तीन रुपयांची वाढ केली आहे तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळचं दूध प्रतिलिटर 54 रुपयांवर पोहोचलं आहे. दरम्यान आजपासून दरवाढ लागू करण्यात आली आहे.

या दूध दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र नवीन दूध दरवाढीचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com