Gold-Silver Price Today : चांदीच्या दरातही वाढ; सोन्याचा उच्चांक गाठण्याची शक्यता

Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरुच

भारतातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु आहे. चांदीच्या दरात 8775 रुपयांची वाढ होऊन 1 किलोचा दर 200750 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदीचा एका किलोचा दर 206772 रुपये प्रति किलो झाला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु आहे. चांदीच्या दरात 8775 रुपयांची वाढ होऊन 1 किलोचा दर 200750 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदीचा एका किलोचा दर 206772 रुपये प्रति किलो झाला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 936 रुपयांची वाढ होऊन ते 132713 रुपयांवर पोहोचलं आहे. जीएसटीसह याचा दर 136694 रुपये आहे. 2025 मध्ये सोन्याच्या दरात 56973 रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात 114733 रुपयांची वाढ झाली आहे.

23 कॅरेट सोन्याच्या दरात 933 रुपयांची वाढ एका तोळ्याचा दर 132182 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह याचा दर 136147 रुपये झाला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 857 रुपयांनी वाढून 121565 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 125211 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दर 702 रुपयांनी वाढून 99535 रुपये एक तोळा झाला आहे. तर, जीएसटीसह याचा दर 102521 रुपये झाला आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरात 547 रुपयांची वाढ होऊन ते 77637 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह याचा दर 79966 रुपये झाला आहे.

वेंचुरा हेट ऑफ कमोडिटी अँड सीआरएमचे एनएस रामास्वामी यांनी चांदीचा पुरवठा कमी झाल्यानं आणि मागणीतील वाढीमुळं चांदीचे दर वाढू शकतात. चांदी 3 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com