ताज्या बातम्या
Gold - Silver Rate : इराण - इस्रायलमधील शस्त्रसंधीचा असाही परिणाम, सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
इराण आणि इस्त्रायल संघर्ष थांबल्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वाढले होते. अखेर इस्त्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. इराण आणि इस्त्रायल संघर्ष थांबल्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला आहे. सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 91 हजार 550 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 99 हजार 870 रुपये इतका आहे. याप्रमाणे चांदीच्या दरातदेखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर घसरून 1 लाख 900 रुपयांवर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गोल्ड फ्युचर्सचे दर 1 लाख रुपयांवर गेले होते. त्यामध्ये घसरण होऊन ते 98 हजार 163 रुपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या वायद्यांचे दर 1 लाख 05 हजार 962 रुपयांवर आहेत.