Gold and silver rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा तेजी सुरु
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा तेजी सुरु झाली आहे. दोन दिवसांमध्ये सोनं 2070 रुपयांनी महागलं आहे. सोन्याची मागणी वाढू लागल्यानं दरातील तेजी कायम आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरणीनंतर पुन्हा तेजी सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात तेजी कायम आहे.शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी 2026 च्या वायद्याचे सोन्याचे दर 1932 रुपयांनी वाढून 129599 रुपयांवर पोहोचले होते. 17 ऑक्टोबरला सोन्याच्या दरानं 132294 रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्यापेक्षा दर 2700 रुपयांनी कमी आहेत.
कमोडिटी एक्सपर्टस नुसार सध्या सोने आणि चांदीच्या दरातील तेजी कारण अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात 25 बेसिस पॉईंटच्या कपातीची शक्यता वाढणं हे एक आहे. अमेरिकेचा डॉलर कमजोर होणं आणि ट्रम्प प्रशासनामुलं वाढत्या राजनैतिक अनिश्चिततेमुळं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. जागतिक शेअर बाजार आणि बाँडमधील तेजी घसरणीमुळं चिंतेत असणारे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक वाढवत आहेत, त्यामुळं सोन्याची मागणी वाढत आहे.
भारतात आता लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळं देशात सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्यानं मागणी वाढली आहे. यामुळं देखील सोने दरात तेजी कायम राहू शकते.जागतिक बाजारात हाजिर सोन्याचा 29 नोव्हेंबरचा दर 4224 डॉलर प्रति औंस इतका आहे. तज्ज्ञांच्या मते सोनं 130500 रुपयांदरम्यान राहू शकतं. जागतिक बाजारात हाजिर सोन्याचा 29 नोव्हेंबरचा दर 4224 डॉलर प्रति औंस इतका आहे. तज्ज्ञांच्या मते सोनं 130500 रुपयांदरम्यान राहू शकतं.

