Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ ; जाणून घ्या आजचे दर
गेल्या काही आठवड्यापासून सोन्याच्या भावात काहीशी घट झालेली पाहायला मिळत होती मात्र आता सोन्याच्या भावात मागील आठवडाभरात तब्बल ७०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.सराफा बाजारात आज पुन्हा सोन्याच्या भावाने नवी उंची गाठली . त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता गळती लागणार हे निश्चित आहे. सोन्याच्या दरामध्ये तेजीच पाहायला मिळालेली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असून याउलट सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागले आहेत.
सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे डॉलरच्या मानाने रुपयाची किंमत, इम्पोर्ट ड्युटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या मागणीत सध्या वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच डॉलर कमकुवत झाला आहे. ज्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे..सोन्याच्या किमती जरी वाढत असल्या तरी मागणी ही जास्तच आहे.सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात तब्बल 700 रुपयांनी अधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
आजच्या बाजारातील सोन्याचा भावानुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमला 1,00,150 रुपये इतकी असून 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमला 91,800 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याची किंमत सुद्धा वाढली असून 10 ग्रॅमला 75,110 रुपये इतकी झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन चांदीचे दर हे सारखेच पाहायला मिळतात. केवळ सोन्यामध्येच नाही तर चांदीच्या दरातही वाढ झालेली असून प्रति किलो 1,13,105 रुपये इतका चांदीचा दर आहे.
जागतिक स्तरावरची आर्थिक अस्थिरता, चलनवाढ, आणि गुंतवणूकदारांचा सोन्याकडे असलेला वाढता कल यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. याचा सर्वात जास्त फायदा सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना झाला असून त्यांना लॉटरीच लागल्याचे चित्र सध्या आहे. तस पाहता सध्या सोन्याला एक मजबूत गुंतवणूक मानतात. त्यामुळे सोन्याच्या दरातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या खिशाला सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे. याउलट सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला या आठवड्यात मोठी कात्री लागली आहे.
सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागले आहेत. मात्र ग्राहकांनी सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि दागिन्यांवर असलेला हॉलमार्क तपासूनच खरेदी करावी. सध्या सोन्याच्या भावातील तेजीमुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला घसरण लागण्याची शक्यता आहे. जर सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबावं लागणार आहे कारण सध्या तरी सोन्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार दर कमी होण्याची वाट पाहत आहेत.