Gold Silver Price: बजेटनंतर सोन्याने गाठला उच्चांक, चांदीही चकाकली
बजेट सादर झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठा झटका बसला आहे. शेअर बाजार आपटला असला तरी सोन्या चांदीच्या दरांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सोन्याचांदीच्या दरांनी अजूनपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर 85 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत.
बजेटनंतर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 84,000 रुपयांच्या घरात गेली आहे. हे आतापर्यंतचे सोन्याचे उच्चांकी दर आहेत. बजेटनंतर सोन्याचे दरांने उसळी घेतली आहे. 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचे दर 85 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. GST सह 999 शुद्धतेच्या सोन्यासाठी प्रति तोळा 84,800 रुपये मोजावे लागणार आहेत. 23 कॅरेट 993 शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 84 हजार 200 रुपयांवर पोहोचलं आहे.
चांदीचे दर
चांदीचे दर मल्टी कॉमोडिटी स्टॉकवर (MCX) प्रति किलो 93 हजार 972 रुपये आहे. ग्राहकांसाठी GST आणि मेकिंग चार्जेस धरुन हे दर आणखी वाढणार आहेत.
सोन्याचे वाढते दर पाहता, सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं आता आवाक्याबाहेर झालं आहे. तर दुसरीकडे शेअर मार्केट गडगडल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. गुंतवणूक म्हणून सोनं घेणार असाल तर 24-23 कॅरेट सोनं घ्यावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर २२ किंवा २० कॅरेट सोन्यात चांदीचे दागिने केले जातात. त्यामध्ये मेकिंग चार्जेस आणि GST चे पैसे ही ग्राहकांना भरावे लागतात. तसेच यामधून निघणारी घटही खूप जास्त असते.