Gold Sliver Rate : सराफा बाजारात मोठी घसरण; चांदी 12,225 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दरही खाली
सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 12,225 रुपयांची घट झाली असून सोनंही 1,232 रुपयांनी स्वस्त झालं आहे.आज जीएसटीशिवाय चांदीचा दर 2,35,775 रुपये प्रति किलो झाला आहे. जीएसटीसह हा दर 2,42,848 रुपये प्रति किलो इतका आहे. बुधवारी चांदीचा दर जीएसटीशिवाय 2,48,000 रुपये होता.
सोन्याच्या दरातही घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीशिवाय दर 1,35,443 रुपये प्रति तोळा झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,39,506 रुपये आहे. बुधवारी हा दर 1,36,675 रुपये होता. 29 डिसेंबर रोजी सोनं 1,38,181 रुपये या उच्चांकावर होतं. त्या तुलनेत आज सोनं 2,718 रुपयांनी स्वस्त आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 1,227 रुपयांनी कमी होऊन 1,34,901 रुपये प्रति तोळा झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,38,948 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर 1,128 रुपयांनी घसरून 1,24,066 रुपये प्रति तोळा झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,27,787 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 924 रुपयांनी कमी होऊन 1,01,582 रुपये प्रति तोळा झाला आहे.
14 कॅरेट सोन्याचा दर आज 79,234 रुपये प्रति तोळा आहे. दरम्यान, इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून दररोज दोन वेळा दर जाहीर केले जातात. हे दर दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता जाहीर होतात. आयबीजेएचे दर आणि प्रत्यक्ष बाजारातील दरात 1,000 ते 2,000 रुपयांचा फरक असू शकतो.
थोडक्यात
• सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
• चांदीच्या दरात तब्बल 12,225 रुपयांची घट झाली आहे.
• सोन्याचाही दर 1,232 रुपयांनी घसरला आहे.
• आज जीएसटीशिवाय चांदीचा दर 2,35,775 रुपये प्रति किलो इतका आहे.
• जीएसटीसह चांदीचा दर 2,42,848 रुपये प्रति किलो झाला आहे.
• बुधवारी जीएसटीशिवाय चांदीचा दर 2,48,000 रुपये प्रति किलो होता.
• या घसरणीमुळे सराफा बाजारात खरेदीदारांचे लक्ष वेधले जात आहे.

