Gold-Silver Price : सोन्या – चांदीच्या भावात पुन्हा चढउतार! जाणून घ्या आजचे दर....

Gold-Silver Price : सोन्या – चांदीच्या भावात पुन्हा चढउतार! जाणून घ्या आजचे दर....

भारतामध्ये सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये 5 जानेवारी रोजी किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे. सलग काही दिवस स्थिर राहिल्यानंतर आजच्या दिवशी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम एक रुपयाने घट झाली असून, चांदीच्या दरातही किंचित घसरण दिसून आली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतामध्ये सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये 5 जानेवारी रोजी किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे. सलग काही दिवस स्थिर राहिल्यानंतर आजच्या दिवशी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम एक रुपयाने घट झाली असून, चांदीच्या दरातही किंचित घसरण दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि देशांतर्गत मागणीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे.

5 जानेवारी रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 13,581 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 12,449 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 10,186 रुपये इतका आहे. याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,24,490 रुपये, 24 कॅरेटचा दर 1,35,810 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 1,01,860 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.

चांदीच्या दरातही आज थोडीशी घसरण झाली असून, प्रति ग्रॅम चांदीचा भाव 240.90 रुपये, तर प्रति किलोग्रॅम 2,40,900 रुपये इतका आहे. तुलनेने 4 जानेवारी रोजी चांदीचा दर प्रति ग्रॅम 241 रुपये आणि प्रति किलो 2,41,000 रुपये होता.

जर कालच्या म्हणजेच 4 जानेवारीच्या दरांशी तुलना केली, तर त्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 13,582 रुपये, 22 कॅरेटचा 12,450 रुपये आणि 18 कॅरेटचा 10,187 रुपये होता. प्रति 10 ग्रॅम दर पाहता, 22 कॅरेट सोनं 1,24,500 रुपये, 24 कॅरेट 1,35,820 रुपये आणि 18 कॅरेट 1,01,870 रुपये दराने विकलं जात होतं. यावरून आज सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याचं स्पष्ट होतं.

महत्त्वाचं म्हणजे, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, केरळ आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर जवळपास समान आहेत. या सर्व शहरांमध्ये 22 कॅरेट सोनं 1,24,490 रुपये, 24 कॅरेट सोनं 1,35,810 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 1,01,860 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.

लग्नसराई, गुंतवणूक आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांकडे ग्राहकांचं विशेष लक्ष असतं. तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारात स्थिरता असली तरी आगामी काळात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि महागाईच्या आकडेवारीनुसार दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी दरांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com