Gold Silver Rate 2025 : सोन्याचा नवा उच्चांक, गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली
नवी दिल्ली : 2025 या वर्षात भारतात सोन्या–चांदीच्या किमतीत अभूतपूर्व वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2025 च्या सुरुवातीपर्यंत सोन्याने तब्बल 66% वाढ नोंदवली, तर चांदीच्या किंमतींमध्ये 85% उछाल पाहायला मिळाला.अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता, डॉलरचे अवमूल्यन आणि रुपया कमकुवत झाल्याने मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी दिसत आहे. विशेषत: चांदीच्या भावात सोन्यापेक्षा जास्त वाढ नोंदली गेली आहे.
आजचे सोने–चांदीचे दर (Gold–Silver Rate Update)
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 1 तोळे सोन्याची किंमत ₹1,30,109 नोंदवली गेली. तर 1 किलो चांदीचा भाव ₹1,80,701 एवढा होता. सहा आठवड्यांच्या उच्चांकानंतर आज सोन्याच्या किंमतींमध्ये हलकी घसरण दिसली.
फेडकडून व्याजदरात बदल तसेच डॉलर–रुपया समीकरणामुळे सोन्याचा वेग थोडा कमी झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.2% घसरून 4222.93 प्रति औंसवर आले आहे. मागील तीन महिन्यांत सोन्यात 25% आणि चांदीत 40% उछाल पाहायला मिळाला.
चांदीचे दर 2 लाख ओलांडणार?
2025 मध्ये चांदीची किंमत जवळपास दुप्पट झाली असून एमसीएक्सवर चांदी ₹1.80 लाख/किलोवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर चांदी 2 लाखांचा आकडा गाठणार का याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजनुसार 2026 मध्येही चांदीची तेजी कायम राहू शकते. जागतिक उत्पादन कमी आणि औद्योगिक मागणी वाढल्याने भारतात चांदी ₹2.30 लाख/किलोपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
विविध कॅरेट सोन्याचे दर (IBJA नुसार)
24 कॅरेट सोने ₹1,28,140
22 कॅरेट सोने ₹1,25,070
20 कॅरेट सोने ₹1,14,050
18 कॅरेट (10 ग्रॅम) ₹1,03,790
14 कॅरेट सोने ₹82,650
विविध कॅरेट सोन्याचे दर (IBJA नुसार)
24 कॅरेट सोने ₹1,28,140
22 कॅरेट सोने ₹1,25,070
20 कॅरेट सोने ₹1,14,050
18 कॅरेट (10 ग्रॅम) ₹1,03,790
14 कॅरेट सोने ₹82,650
एक वर्षात सोन्यात 55 हजारांची वाढ, चांदीत दुहेरी वाढ
31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचा भाव ₹75,000 होता. तो सध्या ₹1,28,140 वर पोहोचला आहे. म्हणजेच तब्बल ₹55,000 वाढ. चांदीचा दर ₹86,000 वरून थेट ₹1.80 लाखवर पोहोचला आहे. यामुळे सोने–चांदीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळालेला आहे.

