वारकऱ्यांसाठी खुशखबर, पंढरपूरसाठी रेल्वेच्या 82 फेऱ्या

वारकऱ्यांसाठी खुशखबर, पंढरपूरसाठी रेल्वेच्या 82 फेऱ्या

विदर्भ, मराठवाड्यासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील भाविकांचा पंढरपूर प्रवास होणार सुखकर...
Published by :
Siddhi Naringrekar

अभिराज उबाळे | पंढरपूर आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात लाखो भाविक घेत असतात अशावेळी पंढरपुरचा भाविकांना सर्व पद्धतीने प्रवास व्हावा. यासाठी मध्य रेल्वेने विदर्भ मराठवाडा आंध्र प्रदेश येथून तेरा विशेष रेल्वे गाड्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये नागपूर , अमरावती , खामगाव , औरंगाबाद , नांदेड , आदिलाबाद , जालना, लातूर, भुसावळ, मिरज अशा ठिकाण हुन विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या १३ विशेष गाड्यांच्या २६ जून ते ३० जून याकाळात विशेष ८२ फेऱ्या होणार आहेत. याशिवाय निजमाबाद, मुंबई , यशवंतपुर , कोल्हापूर अशा दैनंदिन रेल्वे गाड्याही सुरू असणार आहेत. त्यामुळे विदर्भ , मराठवाडा , कर्नाटक , आंध्र प्रदेश , मध्य प्रदेश , गोवा अशा राज्यातून येणाऱ्या विठ्ठल भक्तांना आता पंढरपूरचा प्रवास रेल्वेने अधिक सुखाचा आणि सोयीस्कर होणार आहेत.

आषाढीसाठीच्या विशेष रेल्वे गाड्या:

1. नागपूर-मिरज स्पेशल (4 सेवा)

2. नागपूर-पंढरपूर विशेष (4 सेवा)

3. नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (4 सेवा)

4. खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा)

5. भुसावळ-पंढरपूर विशेष (2 सेवा)

7. मिरज-पंढरपूर अनारक्षित विशेष (10 सेवा)

8. मिरज-पंढरपूर अनारक्षित विशेष (20 सेवा)

9. मिरज-कुर्डूवाडी पूर्णपणे अनारक्षित विशेष (20 सेवा)

10. जालना - पंढरपूर स्पेशल (1सेवा)

11.पंढरपूर - नांदेड स्पेशल (1 सेवा)

12.आदिलाबाद - पंढरपूर (२सेवा )

13. औरंगाबाद - पंढरपूर ( 2 सेवा)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com