AI Mode In India : भारतात सुरू झाला 'AI Mode' चा प्रयोग; Google सर्चमध्ये बुद्धिमत्तेचा नवा अध्याय

AI Mode In India : भारतात सुरू झाला 'AI Mode' चा प्रयोग; Google सर्चमध्ये बुद्धिमत्तेचा नवा अध्याय

गुगलने आपल्या शोध सेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, AI Mode नावाची प्रगत AI-आधारित सर्च सेवा आता भारतामध्ये 'Labs' मध्ये इंग्रजी भाषेत उपलब्ध करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

गुगलने आपल्या शोध सेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, AI Mode नावाची प्रगत AI-आधारित सर्च सेवा आता भारतामध्ये 'Labs' मध्ये इंग्रजी भाषेत उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेमुळे वापरकर्ते आता अधिक सखोल, गुंतागुंतीचे आणि दीर्घ प्रश्न विचारू शकतात आणि त्याला एकाच उत्तरात तपशीलवार माहिती मिळवू शकते.

या AI Mode ची चाचणी सुरुवातीला अमेरिकेत सुरू करण्यात आली होती. आता Google I/O 2025 कार्यक्रमात अधिक देशांत ही सुविधा विस्तारीत करण्यात आली आहे. भारतातील वापरकर्त्यांसाठी ही सेवा एक प्रयोग म्हणून सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांच्या अभिप्रायातून सेवा अधिक परिपूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी योग्य

AI Mode ही सेवा गुगलच्या नवीनतम AI प्रणालीवर आधारित आहे. जी Gemini 2.5 चा खास आवृत्ती वापरते. ही प्रणाली वापरकर्त्याच्या विचारलेला मोठा प्रश्न विविध भागांमध्ये विभागते. त्यावर स्वतंत्रपणे वेगवेगळे वेब शोध करते आणि एकत्रित सखोल उत्तर तयार करते. यामुळे वेबवरील योग्य, विशिष्ट आणि सुसंगत माहिती अगदी कमी वेळात मिळते.

उदाहरणार्थ, कोणी विचारले की, "माझी मुलं खूप ऊर्जावान आहेत, त्यांना घरात खेळण्यासाठी काय सर्जनशील पर्याय आहेत?", असा प्रश्न AI Mode सहजपणे समजून घेतो, त्याचे उपविषय तयार करतो आणि घरगुती, खर्चिक नसलेले उपाय सुचवतो.

बहुपर्यायी संवाद : मजकूर, आवाज, प्रतिमा

AI Mode फक्त मजकुरापुरता मर्यादित नाही. गुगलने या सेवेत मल्टीमोडल सर्च समाविष्ट केला आहे, म्हणजे वापरकर्ता आवाज, फोटो किंवा प्रतिमा अपलोड करून देखील प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या अनोळखी रोपाचा फोटो अपलोड करून "हे कोणतं रोप आहे आणि त्याची निगा कशी राखावी?", असा प्रश्न विचारता येतो.

या पद्धतीमुळे भारतातील वापरकर्त्यांना त्यांच्या स्वाभाविक सर्च पद्धतीनुसार AI Mode वापरणं अधिक सोपं होणार आहे. कारण भारत हा गूगल Lens वापरात आघाडीवर आहे.

AI मोडचा फायदा आणि भविष्यातील योजना

AI Mode हे Google च्या दीर्घकालीन शोधदृष्टीकोनाचा भाग आहे. याआधी ‘AI Overviews’ ही सुविधा 150 कोटीहून अधिक लोक वापरत असून, त्या अनुभवाचा पुढचा टप्पा म्हणजे AI Mode. यामुळे वेबवरील दर्जेदार माहिती अधिक प्रभावी आणि सोप्या पद्धतीने वापरकर्त्यांपर्यंत पोहोचते.

जर AI Mode मध्ये विशिष्ट माहितीबाबत खात्री नसेल, तर पारंपरिक सर्च निकाल दाखवले जातात. पण या प्रयोगात्मक सेवेमधून सतत सुधारणा घडवून आणण्यावर गूगलचा भर आहे.

वापरकर्त्यांसाठी संधी

गुगलने AI Mode ‘Labs’ मधून वापरण्यासाठी खुलं केलं आहे. Labs वर साइन अप करून वापरकर्ते या नाविन्यपूर्ण सर्च अनुभवाचा भाग होऊ शकतात. तसेच आपल्या अभिप्रायातून ही सेवा अधिक सक्षम बनवू शकतात.

हेही वाचा

AI Mode In India : भारतात सुरू झाला 'AI Mode' चा प्रयोग; Google सर्चमध्ये बुद्धिमत्तेचा नवा अध्याय
Rohini Khadse On Thackeray Brother March : "हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण..." रोहिणी खडसेंनी स्पष्ट केली भूमिका
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com