Gopichand Padalkar : राज्य सरकार कंपाऊंडर तर डॉ. आंबेडकर…; आरक्षणाच्या मुद्द्यावर पडळकर म्हणाले...

Gopichand Padalkar : राज्य सरकार कंपाऊंडर तर डॉ. आंबेडकर…; आरक्षणाच्या मुद्द्यावर पडळकर म्हणाले...

पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये छगन भुजबळांची पहिली ओबीसी एल्गार सभा सुरु आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात सुरुवातीला धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Published by :
shweta walge

पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये छगन भुजबळांची पहिली ओबीसी एल्गार सभा सुरु आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात सुरुवातीला धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मार्गदर्शन करत उपस्थित ओबीसी समाजबांधवांना त्यांनी आरक्षण वाचविण्यासाठी शपथ दिली.

काय म्हणाले गोपिचंद पडळकर?

आपल्या ओबीसी आरक्षणाचा लढा एका वाक्यात सांगायचा म्हटलं तर 4 स्टेजचा कॅन्सर पेंशट अजून दवाखान्यात घ्यायचा आहे. त्याला बेड उपलब्ध व्हायचा आहे. तोपर्यंत सर्दी आणि खोकला वाला पेंशट म्हणजे मला ताबडतोब आतमध्ये घ्या, माझं ऑपरेशन करा. आता दवाखान्यात कोणाला घ्यायचं हे सरकार नावाचा जो कंपाऊंडर आहे, त्याच्या हातामध्ये खेळ आहे. कॅन्सर वाल्याला आतमध्ये घ्याचं की, सर्दी आणि खोकला आलेल्या पेंशटला पहिलं आतमध्ये घ्यायचं, हे सर्व कंपाऊंडवर अवलंबून आहे. पण आमचा एकच फिक्स डॉक्टर आहे, ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या कायद्यावर आमचा विश्वास आहे.

महाराजा यशवंतराव होळकर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ही दोन मानस आपल्या आयुष्यात महत्त्वाची आहे. होळकर आंबेडकर फुले यांना जोडणारा धागा यशवंतराव होळकर हे आहेत. महाराष्ट्रात सगळे ओबीसी एक व्हायला लागले आहेत, त्याचे सगळे श्रेय भुजबळ साहेबांना आहेत.

भटक्या विमुक्तांच्या हक्कांचे संरक्षण करतोय आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. धनगर आरक्षणावर अतिक्रमण, गावबंदी ही संविधानाच्या विरोधात आहेत. पुणे जिल्हा हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला असून, त्यामुळे आरक्षण बचाव आपण इथूनच सुरुवात करूयात.

मेंढपाळ समाजाला मारहाण होते, त्यासाठी एक कायदा करणे गरजेचे आहे,त्यामुळे आम्हाला भुजबळ साहेब यांची गरज आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे? मराठा समाजातील लोकांनी त्यांच्यातील सूर्याजी पिसाळ कोण आहे ओळखले पाहिजे?

मराठा समाजाला कोण भडकावत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ओबीसीच्या 22 योजना रखडल्या होत्या. भुजबळ साहेबांनी लक्ष घातल्यावर त्या मार्गी लागल्या आणि काही बाकी आहेत.

ओबीसी नेत्यांनी एक होऊन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. धनगर आरक्षणावर अतिक्रमण, गावबंदी ही संविधानाच्या विरोधात आहेत. पुणे जिल्हा हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला असून,त्यामुळे आरक्षण बचाव आपण इथूनच सुरुवात करूयात.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे ? मराठा समाजातील लोकांनी त्यांच्यातील सूर्याजी पिसाळ कोण आहे ओळखले पाहिजे ?

दरम्यान, राज्यात सध्या ओबीसी वि. मराठा असा वाद सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोध करत यासाठी ओबीसी बचाव मोहीम सुरू केली. राज्यातील विविध भागांत ओबीसी बचाव महाएल्गार सभेचे आयोजन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com