CM Shinde: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २४ तासांतच स्थगित

CM Shinde: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २४ तासांतच स्थगित

शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याचा शासन निर्णय बुधवारी २० सप्टेंबर ला काढण्यात आला होता.
Published by :
shweta walge

राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून महिला सशक्तीकरण अभियानाचा शासन निर्णय बुधवारी घेण्यात आला होता. मात्र २४ तासाच्या आत हा अभियान रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार होते. मात्र हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येणार होता. मात्र चोवीस तासांतच हा अभियान रद्द करण्यात आला आहे.

CM Shinde: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २४ तासांतच स्थगित
शरद पवार गटाविरोधात अजित पवार गटाची आक्रमक भूमिका

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानामध्ये काही बदल करायचे होते आणि शुद्धीपत्रक काढायचे होते पण मुख्यमंत्री आणि बालविकास मंत्री गणेशोत्सवात व्यस्त असल्याने हा निर्णय थेट रद्द करण्यात आला असल्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयातूनच देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com