ताज्या बातम्या
Central Govt Employee DA Hike : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुड न्यूज! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. याच्याआधी जुलै 2024 मध्ये वाढ करण्यात आली होती.
आता केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची करण्यात आली असून यामुळे आता महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचणार आहे. गुढी पाडवाच्या दोन दिवसआधीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
केंद्र सरकारची कॅबिनेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली. या कॅबिनेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.