साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये - अजित पवार

साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये - अजित पवार

फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. या पुरस्काराची निवड समितीही रद्द करण्यात आली आहे. राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले होते. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.'फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन' या पुस्तकाला देण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने हा पुरस्कार आता रद्द केल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून स्थापन करण्यात आलेली निरीक्षण समिती काही कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, साहित्य क्षेत्रात आम्ही कधीही हस्तक्षेप केला नाही. पुरस्कार रद्द करण्याच्या निर्णयाचे सरकार लंगडं समर्थन करतंय. साहित्य क्षेत्रात सरकारचे हस्तक्षेप करणं हे निषेधार्ह आहे. नवीन समस्या निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असे अजित पवार म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की. 6 दिवसांत पडद्यामागे काहीतरी घडलं आणि पुरस्कार रद्द झाला. साहित्य क्षेत्रात राजकीय ढवळाढवळ करु नये. असा शिंदे - फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com