महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी मोठ्या घोषणा केल्या; काय आहेत या घोषणा?
Admin

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी मोठ्या घोषणा केल्या; काय आहेत या घोषणा?

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. आजच कामगार दिवसही साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता.

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच काही घोषणा देखिल केल्या. रमेश बैस म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषकाचे यावर्षी ३५० वे वर्ष आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे. तसेच किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत संग्रहालय उभारण्यात येईल. २ ते ९ जून २०२३ काळात शिवराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com