ग्रामपंचायत निवडणूक निकाल: महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील - देवेंद्र फडणवीस

ग्रामपंचायत निवडणूक निकाल: महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील - देवेंद्र फडणवीस

ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मागच्या वेळेस आम्ही सांगितलेलं की आमच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या. त्यांनी विचारलेलं कशावरुन आल्या? आमच्या बावनकुळेंनी नावासहीत यादी घोषित केली. तसेच त्या ठिकाणींहून आम्ही भाजपाचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत असंही सांगितलं. त्यामुळे काही काळजी करु नका, पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी उभी राहणार,

तसेच ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका,” असे फडणवीस यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com