
आजकाल वाढते वजन ही अनेकांची मोठी डोकेदुखी बनली आहे. वजन वाढले की त्यासोबत साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांचा धोका वाढतो. विशेषतः पोट आणि मांड्यांवर साठलेली चरबी कमी करणे कठीण जाते. महागडे डाएट, जिम आणि सप्लिमेंट्स वापरूनही फारसा फरक पडत नाही, उलट आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशावेळी स्वयंपाकघरातील कढीपत्ता हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.
शरीराची पचनशक्ती वाढवतो. चयापचय क्रिया सुधारतो. पोटावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवतो. नैसर्गिक पद्धतीने शरीर स्वच्छ (डिटॉक्स) करतो.
सकाळी उठल्यावर उपाशीपोटी २–३ ताजी पाने चावून खावीत. रोज घेतल्यास काही आठवड्यांत फरक जाणवतो.
एका भांड्यात पाणी उकळवा. त्यात १०–१५ कढीपत्त्याची पाने टाका. पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्या. गाळून थोडे थंड झाल्यावर लिंबाचा रस मिसळा. सकाळी चहाऐवजी हे पाणी प्या
कॅलरी कमी होण्यास मदत. शरीरातील घाण बाहेर टाकली जाते. वजन घटण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या वेग घेते.