Dress Code : उन्हाळ्याच्या सुट्टीत अष्टविनायक ट्रीप प्लॅन करतायं, 'हे' नियम नक्की वाचा

Dress Code : उन्हाळ्याच्या सुट्टीत अष्टविनायक ट्रीप प्लॅन करतायं, 'हे' नियम नक्की वाचा

ही पाच मंदिरं ज्या ट्रस्टच्या अखत्यारीत आहेत, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही पाच मंदिरं ज्या ट्रस्टच्या अखत्यारीत आहेत, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करुन दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचंही चिंचवड देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे. त्यामुळे, यापुढे अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातील पाचही गणपती मंदिरात आता परिपूर्ण आणि अंगभरुन पोशाख घालूनच भाविकांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहिले पाहिजे.

मंदिर प्रवेशासाठी पोशाखाची नियमावली 'अशी'

  • पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.

  • महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.

  • कोणीही अत्याधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीर प्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com