गुजरात निवडणूक : गुजरातमध्ये २९० कोटी कॅश, ५०० कोटींहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त
Admin

गुजरात निवडणूक : गुजरातमध्ये २९० कोटी कॅश, ५०० कोटींहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त

गुजरातमधील विधानसभेच्या ८९ जागांसाठी आज (१ डिसेंबर) पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुजरातमधील विधानसभेच्या ८९ जागांसाठी आज (१ डिसेंबर) पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी आम आदमी पक्षाने (आप) 181 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करून ही लढत रंजक बनवली आहे. गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी रिंगणात आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता गुजरातमधून एक मोठी कारवाईची बातमी समोर येत आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान २९० कोटी रुपयांची रोकड, मादक पदार्थ, दारुचा साठा आणि भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

यामध्ये नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ प्रामुख्याने मेफेड्रोनची तस्करी केली जात असल्याची दोन प्रकरण उघडकीस आली आहेत. या छापेमारीमध्ये ४७८ कोटी किंमतीचं १४३ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं असून पाच जणांना अटक करण्यात आलीय. गुजरात एटीएसच्या या मोहिमेदरम्यान प्रतिबंध असलेल्या औषधांबरोबरच ६१ कोटी ९६ लाखांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. १४ कोटी ८८ लाख किंमत असलेली चार लाख लिटर दारुही जप्त केल्याचं आयोगाने म्हटलं आहे. दारुबंदी असलेल्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळल्याने चर्चांना उधान आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com