राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी
Admin

राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी

राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. राहुल गांधी यांची केस दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग केली जाणार आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे.

सुरत न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी ही याचिका सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. कर्नाटकमध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळी राहुल यांनी मोदी आडनावाविषयी बोलले होते.

राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती. त्यामुळं आज गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com