Gujarat Pavagadh Ropeway Accident
Gujarat Pavagadh Ropeway Accident

Gujarat Pavagadh Ropeway Accident : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; रोपवे कोसळून सहा जणांचा मृत्यू

गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ पावागडमध्ये भीषण दुर्घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

गुजरातच्या पावागडमध्ये मोठी दुर्घटना

रोपवे कोसळून सहा जणांचा मृत्यू

सध्या पोलीस व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत

(Gujarat Pavagadh Ropeway Accident) गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ पावागडमध्ये भीषण दुर्घटना घडली. मालवाहू रोपवे कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. रोपवेची मुख्य तार तुटल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली. सध्या पोलीस व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत मृतांमध्ये दोन लिफ्टमॅन, दोन मजूर आणि इतर दोन जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दुर्घटनेचं कारण अद्याप समजलं नाही आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com