Gulabrao Patil : ...म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना कोणी हलक्यात घेऊ नये, ते जडच आहेत, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंना टोला

Gulabrao Patil : ...म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना कोणी हलक्यात घेऊ नये, ते जडच आहेत, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंना टोला

महायुतीत धुसफूस वाढत असताना, गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल माध्यमांशी चर्चा केली. शिंदेंना धमक्या आल्यावर त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुख्यमंत्री पदावरून डावलल्यानंतर एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये बाजूला सारल जात असल्याची चर्चा आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दरी वाढत असल्याच्या देखील चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महायुतीत मागील गेले काही दिवसांपासून धुसफूस होत असलेली पाहायला मिळत आहे. असं असताना गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे तसेच एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांविषयी माध्यमांशी चर्चा केली आहे.

शिंदेंना कोण धमक्या देत असेल तर...

एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीच्या प्रकरणावर गुलाबराव पाटील म्हणाले की, अशा लोकांवर तत्कालीन कारवाई करावी. कारण एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे नेते आहेत. अशा माणसाला जर कोणी धमक्या देत असेल तर ते सहन करण्याची ताकद आमच्यात पण नाही, आणि वेळ आली तर शिवसेना सगळी रस्त्यावर उतरेल, असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला. तसेच पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, जोपर्यंत आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणावर आरोप करण मला तरी योग्य वाटत नाही. पोलिस प्रशासन यावर निश्चित योग्य ती कारवाई करेल आणि दोषीला शिक्षा देईल.

... तर ठाकरेंना कोणताच धक्का लागणार नाही

एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी सांगितल होत की आपण पुढच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा जिंकू आम्ही तिघ मिळून महायुतीच सरकार आणू आणि त्यांनी हे करून दाखवल. त्यामुळे ते जस म्हणाले की, मला हलक्यात घेऊ नका ते बरोबरच म्हणाले आहेत. कारण ते एकनाथ शिंदे हे जडचं आहेत. पुढे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी फक्त संजय राऊत यांना धक्का द्यावा त्यांना कोणताच धक्का लागणार नाही, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com