ताज्या बातम्या
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : 'मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये'; गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मागणी
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध, सदावर्तेंची सरकारकडे मागणी
मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात येणार आहेत. यावेळी आरक्षण घेऊनच जाणार असा इशारा सुद्धा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. यासाठी मनोज जरंगे यांना मुंबईत 29 ऑगस्टला आंदोलन करू देण्यात येऊ नये व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आझाद मैदान पोलीस स्थानकात पोलीस तक्रार देण्याकरिता गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील थोड्याच वेळात येत आहेत.