Kapil Sharma Cafe Attack : कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार, 'या' गँगने घेतली जबाबदारी
कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेवर एकदोन वेळा गोळीबार झाल्यानंतर, आता पुन्हा तिसऱ्यांदा गोळीबार झाला आहे. यापूर्वी, कॅप्स कॅफेवर 10 जुलै आणि 7ऑगस्टला दोन वेळा गोळीबार झाला होता. या ताज्या घटनेनंतर, गोळीबाराच्या जबाबदारीचा स्वीकार लॉरेंस बिश्नोई गँगच्या गोल्डी ढिल्लो आणि कुलदीप सिद्धू नेपाळी यांनी केला आहे.
सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहून ही जबाबदारी घेतली आणि सांगितले की, "आज सरे येथील कॅप्स कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबार झाला, आणि त्याची जबाबदारी आम्ही घेतो." त्यांनी पुढे असंही म्हटलं की, "आमचे सामान्य जनतेसोबत कोणतेही वैर नाही. ज्यांच्याशी आमचा भांडण आहे, ते आमच्यापासून दूर राहतील."
गोल्डी ढिल्लो आणि कुलदीप सिद्धू यांचीही धमकी:
त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, "जे लोक बेकायदेशीर काम करतात आणि लोकांना पैसे देत नाहीत, ते तयार राहतील," असंही लिहिले आहे. बॉलिवूडमधील काही लोकांवर ते परत एकदा टीका करत म्हणाले की, "जे धर्मविरोधी बोलतात, त्यांनाही तयार राहायला लागेल. गोळी कुठूनही येऊ शकते."
पूर्वीचे गोळीबार:
कपिल शर्माच्या कॅफेवर 10 जुलै आणि 7ऑगस्टला देखील गोळीबार झाला होता. त्या वेळेसही गोल्डी ढिल्लो आणि लॉरेंस बिश्नोई गँगने जबाबदारी घेतली होती. त्यावेळी, गोल्डी ढिल्लोने सोशल मीडियावर पोस्ट केली होती, "आम्ही फोन केला, पण फोन उचलला नाही, म्हणून कारवाई करावी लागली." त्याच वेळी त्यांनी चेतावणी दिली होती की, "जर उत्तर मिळाले नाही, तर पुढे मुंबईत कारवाई होईल." तिसऱ्या गोळीबारानंतरही, लॉरेंस बिश्नोई गँगच्या सदस्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले आणि परिस्थिती आणखी तणावपूर्ण केली आहे.