Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteTeam Lokshahi

"राम जन्मभूमी प्रकरणात आम्ही वकील होतो, लवकरच अयोध्येला जाणार"

गुणरत्न सदावर्ते यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई : गेल्या काही दिवसांत अयोध्या हा विषय चर्चेत आहे. राज्यातील अनेकांनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केलं असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनीही अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अयोध्या दौऱ्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गावदेवी पोलिसांनी आज गुणरत्न सदावर्ते यांना 110 अंतर्गत नोटीस धाडली आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं यासाठी आम्ही अयोध्येत वकील म्हणून लढत होतो. त्यामुळे आम्हाला तिथे बोलावण्यात आलं आहे. एस. टी. कर्मचारी कष्टकरी जनसंघाचे आम्ही लोक तिथे जाणार आहोत. त्याठिकाणी साधूसंत आमचं स्वागत करणार आहे असं सदावर्ते म्हणाले. (Gunratna Sadavarte Ayodhya Visit)

Gunratna Sadavarte
"देखना है जोर कितना..."; अयोध्येतील संत समाजाचं राज ठाकरेंना आव्हान

मुंबईतील गावदेवी पोलिसांनी आज गुणरत्न सदावर्ते यांना नोटीस पाठवली. 110 अंतर्गत पाठवलेल्या या निटीशीमध्ये सदावर्तेंना चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. ही नोटीस आल्यानंतर आज पुन्हा एकदा सदावर्तेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. एसटी बँकेचा मुद्दा उपस्थित केल्यानं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश आमच्या बाजुनं असतील, असं गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं आहे. तसंच आम्ही या महिन्याच्या अखेरीस आम्ही अयोध्येला जाऊ असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Gunratna Sadavarte
कम्पाऊंडरने डॉक्टरला प्रश्न विचारले; नवनीत राणांचा पेडणेकरांना टोला
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com