गुरमीत राम रहीमला पुन्हा ४० दिवसांची पॅरोल

गुरमीत राम रहीमला पुन्हा ४० दिवसांची पॅरोल

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे.

हरियाणाचे तुरुंगमंत्री रणजितसिंह चौटाला यांनी डेरा प्रमुखाच्या ताज्या पॅरोल अर्जावर भाष्य करताना सांगितले डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तीन महिन्यांपूर्वी 14 ऑक्टोबर 2022 रोजी राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला होता. त्याची पॅरोलची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली होती. आता पुन्हा एकदा राम रहीम पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येत आहे.

डेरा प्रमुखाने ४० दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता, जो रोहतक विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. पॅरोलच्या कालावधीत डेरा प्रमुख 25 जानेवारी रोजी माजी डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांच्या जयंती सोहळ्याला ही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. असे हरियाणाचे तुरुंगमंत्री रणजितसिंह चौटाला यांनी डेरा प्रमुखाच्या ताज्या पॅरोल अर्जावर भाष्य करताना सांगितले

पॅरोलची बातमी मिळताच आश्रमात स्वागताची तयारी सुरू झाली आहे. त्याच्या पॅरोलची मुदत २५ नोव्हेंबरला संपली होती. पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशातील आपल्या बरनवा आश्रमात गेला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com