gyanvapi mosque
gyanvapi mosqueTeam Lokshahi

ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका स्वीकारली

हिंदू पक्षाची याचिका स्वीकारत न्यायालय २२ सप्टेंबरला निकाल देणार
Published on

ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला होता. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद संकुलात असलेल्या माँ शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेची मागणी करणारी हिंदू समाजाच्या बाजूने याचिका दाखल केली गेली होती, ती याचिका कायम ठेवण्या योग्य आहे की नाही त्यावरच वाराणसीचे जिल्हा न्यायालयाने आज सुनावणी केली आहे. मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत हिंदू पक्षकारांची याचिका स्वीकारली आहे. दरम्यान, या वरचा निर्णय आता 22 सप्टेंबरपर्यंत देण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण ?

ज्ञानवापी मशिदी बाहेरील भिंतीवर असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजा करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी दिल्लीतील राखी सिंग आणि वाराणसीतील चार महिलांनी गेल्या वर्षी न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यानंतर मात्र दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार मे महिन्यामध्ये ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल गेल्या 19 मे रोजी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला होते, त्यानंतर सर्वेक्षणादरम्यान, हिंदू बाजूने ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता, तर मुस्लिम बाजूने ते कारंजे असल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व प्रकरणावर त्यावरच आता वाराणसी जिल्हा न्यायालयाने आजची सुनावणी करत याचिकाकर्त्यांना 15 सप्टेंबर ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com